चंद्रपूरसाठी तातडीनं रेमडेसीवीर उपलब्ध न केल्यास आंदोलनचा मुनगंटीवारांचा इशारा |Mungantiwar warns of agitation if Remadesivir is not made available for Chandrapur immediately

Share This News

चंद्रपूरः चंद्रपुर जिल्ह्यासाठी तातडीने रेमडेसीवीर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा स्पष्ट इशारा माजी अर्थमंत्री आणि विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना दिला. यानंतर डॉ. शिंगणे यांनी जिल्ह्यासाठी तातडीने इंजेक्शन्सचा पुरवठा करण्याचे आश्वसन मुनगंटीवार यांना दिले.
चंद्रपूर जिल्‍हयात रेमडेसीवीर इंजेक्‍श्‍नचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्‍यामुळे कोरोना रूग्‍णांचे हाल होत आहेत. मृत्‍युदर वाढत असतानाही चंद्रपूर जिल्‍हयासाठी इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील इतर शहरांना इंजेक्शन्स उपलब्ध केले जात असताना चंद्रपूर जिल्ह्याबाबत असा सापत्न भाव का सुध्‍दा इंजेक्‍शन उपलब्‍ध केले, मात्र चंद्रपूर जिल्‍हयाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे.
नागपूरच्‍या डेपोमध्‍ये इंजेक्‍शन्सचा साठा पोहोचला असून चंद्रपूर जिल्ह्यासाठी उद्या सकाळपर्यंत इंजेक्शन्स उपलब्ध करावे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.