मुनगंटीवार रोज करणार राष्ट्रपती राजवटीची मागणी Mungantiwar will demand presidential rule every day

Share This News

मुंबई : जवळगाव येथील शासकीय आशादीप वसतिगृहात पोलिस कर्मचारी आणि काही पुरुषांनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडले. या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा प्रचंड आदर केला. परंतु त्याच महाराजांच्या नावाखाली सरकार चालवित असल्याचा देखावा करणाऱ्या शिवसेना व त्यांच्या चट्ट्याबट्ट्या पक्षांना महाराष्ट्रात रयतेचे राज्य चालविता येत नसल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केली. त्यामुळे आता रोज आपण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विधान सभेत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील आई-बहिणींना विवस्त्र करून नाचविले जात आहे. राज्याचे गृहमंत्री मात्र गप्प आहेत. आता महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. त्यामुळे आता आपण रोज राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहोत. त्यासाठी प्रयत्नही करणार आहोत, असे ते म्हणाले.

मुनगंटीवार रोज करणार राष्ट्रपती राजवटीची मागणी


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.