मुनगंटीवारांकडून पवारांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव Mungantiwara’s motion against Pawar

Share This News

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास मंडळांचा मुद्दा विधिमंडळात चांगलाच पेटला आहे. या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते, चंद्रपूरचे आमदार तथा राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
मुनगंटीवार यांनी दाखल केलेला हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठविण्याचे निर्देश प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत. अजित पवार यांनी वैधानिक विकास मंडळ देण्यात येईल, असे आश्वासन १५ डिसेंबर २०२० रोजी दिले होते. सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे, असे नमूद करीत मुनगंटीवार यांनी हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच मुनगंटीवार यांनी मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा लाऊन धरला आहे. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असे मुनगंटीवार यांनी प्रस्ताव दाखल करताना नमूद केले. सरकारने विदर्भ आणि मराठवाड्याच्या वैधानिक विकास महामंडळला मुदतवाढ दिली नाही. वैधानिक विकास मंडळाच कवच ने देता सरकार निधीची तरतूद करत आहे. मंडळच नसल्याने विदर्भ आणि मराठवाड्याला दिलेले पैसे अन्य भागांत खर्च होतील. त्यामुळे नवीन अनुशेष आणि पुन्हा समिती नेमावी लागेल, असे सांगत सरकारने तातडीने वैधानिक विकास मंडळाची स्थापना करावी, अशी मागणी करीत पहिल्याच दिवशी मुनगंटीवार यांनी सभात्याग केला होता. आता त्यांनी आपला लढा अधिक प्रखर केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.