मनपा कर्मचार्यांचा संपाचा इशारा

Share This News

हिवाळी अधिवेशनाच्या दिवसापासूनच करणार बेमुदत संप

महापालिकेचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांपासून सतत संघर्ष करत आहेत. दरम्यान, सातवा वेतन आयोग लागू करण्या संदर्भात तसेच, कर्मचार्‍यांच्या प्रलंबित विविध मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात, याकरिता कर्मचार्‍यांनी थेट हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच संपाचा इशारा दिला आहे.
महापालिका कर्मचारी व शिक्षक हे संपात सामिल असतील असे राष्ट्रीय नागपुर कार्पोरेशन एम्प्लाइज एसोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे व जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे यांनी मनपा प्रशासनाला मंगळवारी नोटीसद्वारे कळविले आहे.
दरम्यान, कोरोनाचे वाढते संक्रमण बघता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी संपातून वगळण्यात आले आहेत. हे कर्मचारी कर्तव्य ठिकाणी काळय़ा फिती लावून काम कतील अशी माहिती सुरेंद्र टिंगणे यांनी दिली आहे. मनपा कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा याकरिता संघटनेसोबत कर्मचार्‍यांनी मोठा संघर्ष केला. वेळोवेळी तीव्र आंदोलनेदेखील केलीत. यानंतर मनपा सभागृहाच्या निर्णयानंतर मागण्यांसदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. परंतु हा प्रस्ताव प्रलंबित आहे. राज्यातील अनेक महापालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. राज्य शासनाने याला मंजुरी दिली, परंतु नागपूर महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये रोष व्याप्त आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.