नागपूर शहरात भर दुपारी खुनाची घटना, वाठोडा पोलिस स्टेशन हद्दीतील श्रावण नगर मध्ये हत्याकांड
आकेब अब्दुल सत्तार असे मृताचे नाव आहे तर प्रकाश कोसरे असे मुख्य आरोपीचे नाव आहे.वाठोडा पोलिस स्टेशन हद्दीतील श्रावण नगर मध्ये आज दुपारी १२ च्या सुमारास मृत आकेब सत्तार याचेशी आरोपी प्रकाश कोसरे व त्याच्या इतर ३ साथीदारांसह वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की आरोपी आरोपींनी लाकडी दांडा व धारधार शस्त्राने आकेब वर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मानेवर वार केल्याने आकेबचा जागीच मृत्यू झाला. हल्ला करून आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शव ताब्यात घेतले व उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी वेळीच आरोपींचा कसून शोध घेतला व चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृत आकेब हा आटो चालक होता,त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच चार पैकी ३ आरोपी हे देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पैशाच्या वादातून खुनाची ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.