नागपूर : नियमभंग करणा-या नागरिकांवर कारवाई

Share This News

बुधवारी मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ६६ नागरिकांविरुध्द कारवाई केली तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ३३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले.

मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६५१२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,६६,१५,०००/- चा दंड वसूल केला आहे. . मनपा उपद्रव शोध पथक व रेल्वे पोलिस बल यांनी संयुक्तपणे रेल्वे स्थानकावर मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई सुरु केली असून दररोज ही कारवाई  करण्यात येणार आहे.

यासोबत उपद्रव शोध पथकाने १४ प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. १,१०,००० चा दंड वसूल केला. पथकाने के.आर.पांडव कॉलेज, निर्मल नगरी वर रु १०,०००, बिग बाजार एम्प्रेस मॉलवर रु. १०,००० तसेच आर.डी.डिस्ट्रीब्यूटर्स,‍ टिंबर मार्केटवर रु २५,००० चा दंड केला. 

विदर्भ शेतकरी भंडार, प्रतापनगर आणि कृष्णा इंफोटेक, सीताबर्डी ला सुध्दा रु १०,००० चा दंड लावण्यात आला. पथकानी ४९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडण्यात आली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.