नागपूर : गृहमंत्र्यांच्या घरासमोर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

Share This News

औरंगाबाद येथे काही दिवासापूर्वी एका तरूणीवर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षाने आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे…या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी नागपूरात भाजप युवा मोर्चातर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘घराला घेराव’ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला .मात्र गृहमंत्र्यांच्या घरापासून १०० मीटर अंतरावरच भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमधे शाब्दिक चकमक सुद्धा पहायला मिळाली.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात महिलांवरिल अत्याचार वाढले आहे. औरंगाबाद येथे मेहबूब शेख यांनी तरूणीवर अत्याचार केल्याची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या गावात मेहबूब शेख नावाचा त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती नसल्याचा दावा करीत राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आरोप फेटाळले आहेत. पण या घटनेचा निषेध म्हणून. बुधवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा घराला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आलं. यावेळी युवा मोर्चा चे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र घेराव घालण्यासठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या घरापर्यत पोहण्याआधीच हे आंदोलन चिरडले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमधे काही काळ चांगलीच शाब्दिक चकमक पहायला मिळाली. आंदोलक कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आल्या…महाराष्ट्रात महिलांवरिल वाढते अत्याचार पाहता गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. अशी मागणीही यावेळी भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आली


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.