२३८ नवीन बाधितांची भर.

Share This News

करोनाच्या उद्रेकानंतर प्रथमच केवळ चार मृत्यू

नागपूर :  करोनाचा उद्रेकाच्या तीन महिन्यानंतर जिल्ह्य़ात आज मंगळवारी पहिल्यांदा केवळ ४ मृत्यू नोंदवले गेले.  याशिवाय नवीन २३८  बाधितांची भर पडली.

३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला जिल्ह्य़ातील विविध रुग्णालयांत प्रत्येकी ७ मृत्यू झाले. ८ नोव्हेंबरला सर्वात कमी ६ मृत्यू नोंदवले गेले होते. परंतु मंगळवारी शहरात २, ग्रामीणला १, जिल्ह्य़ाबाहेरील १ अशा केवळ ४ मृत्यूची नोंद झाली. ही करोनाचा उद्रेकानंतरची सर्वात कमी मृत्यूसंख्या आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ४६०, ग्रामीण ५८४, जिल्हय़ाबाहेरील ४४० अशी एकूण ३ हजार ४८४ वर पोहचली आहे. शहरात दिवसभरात १६१, ग्रामीणला ७६, जिल्हय़ाबाहेरील १ अशा २३८ नवीन बाधितांची भर पडली.

त्यामुळे येथील शहरी भागात आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ८३ हजार २०७, ग्रामीण २१ हजार ५५४, जिल्हय़ाबाहेरील ६२२ अशी एकून १ लाख ५ हजार ३८३ वर पोहचली आहे.

२४ तासांत २८२ करोनामुक्त

शहरात २४ तासांत १५७, ग्रामीणला १२५ असे एकूण २८२ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ७८ हजार २६९, ग्रामीण २० हजार ४७५ अशी एकूण ९८ हजार ७४४ वर पोहचली आहे. येथील बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९३.७० टक्के आहे.

गृह विलगीकरणात १,९९३ रुग्ण

शहरात मंगळवारी २ हजार ४७८, ग्रामीणला ६७७ असे एकूण ३ हजार १५५ सक्रिय करोना बाधित होते. त्यातील ९२४ बाधितांवर विविध रुग्णालयांत  तर १ हजार ९९३ बाधितांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

विदर्भातील मृत्यू

(१० नोव्हेंबर)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                  ०४

वर्धा                        ००

चंद्रपूर                    ०२

गडचिरोली             ०१

यवतमाळ              ०१

अमरावती             ००

अकोला                 ०१

बुलढाणा                ००

वाशीम                   ००

गोंदिया                   ०१

भंडारा                    ०१

एकूण                     ११


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.