बाधित वाढल्याने करोनामुक्तांचे प्रमाण घसरले
२४ तासांत ९ मृत्यू; ४०३ नवीन रुग्ण
नागपूर : जिल्हय़ात २४ तासांत ९ करोनाबाधितांचा मृत्यू तर ४०३ नवीन रुग्णांची भर पडली. सलग चौथ्या दिवशी जिल्ह्य़ात करोनामुक्तांच्या तुलेत नवीन रुग्ण जास्त आढळल्याने शहरातील करोनामुक्तांचे प्रमाण घसरून ९१.६७ टक्यांवर आले आहे.
शहरात दिवसभरात ३३७, ग्रामीण ६२, जिल्हय़ाबाहेरील ४ अशा एकूण ४०३ रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ९१ हजार ५९१, ग्रामीण २३ हजार ४१९, जिल्हय़ाबाहेरील ७१८ अशी एकूण १ लाख १५ हजार ७२६ वर पोहचली आहे. दिवसभरात शहरात २, ग्रामीणला ३, जिल्हय़ाबाहेरील ४ अशा एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ५७६, ग्रामीण ६५१, जिल्हय़ाबाहेरील ५३६ अशी एकूण ३ हजार ७६३ वर पोहचली आहे.
दरम्यान, शहरात ५ हजार ५७, ग्रामीणला ८१६ असे एकूण ५ हजार ८७३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील १ हजार १०९ रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर ४ हजार ४६१ बाधितांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.
चाचण्यांची संख्या पाच हजारांखाली
दिवसभरात शहरात ३ हजार ९३२, ग्रामीण १ हजार ११ अशा एकूण ४ हजार ९४३ चाचण्या करण्यात आल्या. त्यातील बाधितांची संख्या बघता सकारात्मक अहवालाचे प्रमाण ८.१ टक्के होते. एकूण चाचण्यांपैकी १ हजार ६५५ चाचण्या या खासगी प्रयोगशाळेतील होत्या.
विदर्भातील मृत्यू
(९ डिसेंबर)
जिल्हा मृत्यू
नागपूर ०९
वर्धा ००
चंद्रपूर ०२
गडचिरोली ०१
यवतमाळ ००
अमरावती ०१
अकोला ००
बुलढाणा ०१
वाशीम ००
गोंदिया ००
भंडारा ०४
एकूण १८