नागपूर : डॉ. रिचा जैन यांना ७.५0 लाखांचा चुना

Share This News

नागपूर : ब्युटिशियन डॉ. रिचा जैन यांना त्यांच्या क्लिनिकमध्ये काम करणार्‍या दोन महिला आणि एका पुरुषाने ७ लाख ५0 हजारांचा चुना लावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, लकडगंज हद्दीत गांधी ग्रेन मार्केट, टेलिफोन एक्सचेंज चौक येथे राहणार्‍या डॉ. रिचा राजकुमार जैन यांचे त्यांच्या घरीच क्लिनिक आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये हेअर आणि स्किन ट्रिटमेंट केली जाते. त्यांच्याकडे मोठय़ाप्रमाणात लोक ट्रिटमेंट करायला येत असतात. त्यामुळे हेअर आणि स्किनसाठी लागणारे विविध प्रोडक्टची त्यांना गरज असते. तसा ते ट्रिटमेंटनंतर त्यांच्याकडे येणार्‍या लोकांनाही ते प्रोडक्ट वापरायला देतात. त्यामुळे त्यांच्याकडे ब्युटी प्रोडक्टची घेवाण देवाण सुरू असते. त्यांच्या क्लिनिकमध्ये कुशीनगर जरीपटका येथे राहणारा शिशिर हंसपाल (४२) हा काम करीत होता. त्याने क्लिनिकमध्ये काम करणार्‍या दोन महिलांशी संगनमत करून तेथे वापरण्यात येत असलेल्या प्रोडक्टचे १४ बिल गायब केले. त्यांनी प्रोडक्टच्या नावावर डॉ. रिचा यांची ७ लाख ५0 हजार रुपयांची फसवणूक केली. डॉ. रिचा यांना क्लिनिकमध्ये अफरातफर झाल्याचे कळताच त्यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येत आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.