नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर,1 डिसेंबर रोजी मतदान होणार .

Share This News

भाजपात उमेदवारीसाठी अनिल सोले व संदीप जोशी यांच्यात शर्यत

पुढ्यात असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांना उमेदवारी मिळणार की विद्यमान महापौर संदीप जोशी यांच्या पारड्यात उमेदवारीचे दान पडणार याबाबत नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगते आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनपा निवडणुकीतून सन्यास घेण्याच्या विद्यमान महापौरांच्या घोषणेचा संदर्भ ‘या’ निवडणुकीशी जोडला जात असून, उमेदवारीच्या या शर्यतीत सरशी संदीप जोशी यांची होण्याची शक्यताही येथेे वर्तविली जात आहे.
बव्हतांशी भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिलेला हा मतदारसंघ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कॉंग्रेसनेही यश प्राप्त करण्यात अपयश आलेले असले तरी या मतदारसंघात तगडी लढत दिली आहे. त्या पक्षातर्फे यंदा . अभिजित वंजारी, प्रा. डॉ. जयंत जांभुळकर, प्रा. मििंलद वानखेडे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छ प्रदर्शित करीत उमेदवारीची मागणी केली आहे. दरम्यान, प्रा. राहुल वानखेडे यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी चालवली आहे.
2014 मध्ये नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रा. सोले यांनी ही निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. त्यांची टर्म गेल्या जून महिन्यातच संपली आहे. मात्र, यंदाच्या कोरोनाच्या परिस्थितीत निवडणूक लांबणीवर पडल्याने त्यांचा कार्यकाळही ओघानेच वाढला.
भाजपात गडकरी-फडणवीस गोटातील चढाओढीत उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हा प्रश्न तर, कॉंग्रेसमधील इच्छुकांमधील वंजारी व जांभुळकर यापैकी एक जण पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या जवळचा तर दुसरा विरोधी गटातील असल्याने त्यांच्यापैकी कोणाची निवड होते, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.