नागपूर : संचारबंदी दरम्यान सुरू असणार वाचनालय, अध्ययन कक्ष Nagpur: Library, study room to be opened during curfew

Share This News

नागपूर, 15 मार्च  कोरोना संकटाच्या सावलीत  मार्च महिन्यात होणाऱ्या विविध परीक्षा लक्षात घेता १५ ते २१ मार्चदरम्यान लावण्यात आलेल्या बंधनातून वाचनालये आणि अध्ययन कक्ष  वगळण्यात आले आहे. शिवाय खाजगी कार्यालय व अस्थापनांनाही लेखाविषयक कामांकरिता १० जणांच्या उपस्थितीत कार्य करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार, वाचनालये, अभ्यासिका, अध्ययन कक्ष क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवता येतील. खाजगी कार्यालये, आस्थापनांमध्ये १० व्यक्तींच्या उपस्थितीत लेखाविषयक कामे, कामगारांचे, कर्मचाऱ्याचे वेतनाविषयक कामे करता येतील. व्यवसायासाठी या आस्थापना उघडण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी असलेल्या खाजगी आस्थापना, कार्यालयानांच ही परवानगी असेल.

अत्यावश्यक स्टॅण्ड अलोन दुकानांच परवानगी

किराणा, भाजीपाला, फळ यासह मांस, मटनाची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी केवळ स्टॅण्ड अलोन दुकानांसाठीच आहे. मार्केट ठिकाणी असलेली किंवा एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त सलग दुकाने असल्यास परवानगी राहणार नाही.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.