लॉकडाउनमध्ये नागपूर मेट्रो सुरू राहणार Nagpur Metro will continue in lockdown

Share This News

नागपूर : उपराजधानी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात नागपूर मेट्रोची सेवा सुरू राहणार आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर मेट्रो रेल्वे सेवा ५० टक्के क्षमतेने मेट्रो सेवा सुरू राहणार आहे.


खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासले जाईल. कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांना मेट्रोत प्रवेश दिला जाणार नाही. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ऑरेंज लाइनवर (सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आणि अॅक्वा लाइनवर (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मेट्रो स्टेशनदरम्यान सकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रवासीसेवा सुरू राहील.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.