नागपूर : महावितरणची “एक गाव – एक दिवस” मोहीम

Share This News

नागपूर, १९ जानेवारी (हिं.स.) : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्री मोहिमेतील “एक गाव-एक दिवस” या महावितरणच्या उपक्रमास जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली असून मोहिमेच्या पहिल्या दिवशी खापरखेडा उपविभागातील सिल्लेवाडा येथील ३२ वीज ग्राहकांचे मीटर बाहेर काढून दर्शनी भागात लावण्यात आले. या सोबतच गावातील वीज समस्यांचे निराकरण करण्यात आले. “एक गाव एक दिवस” योजने अंतर्गत सिल्लेवाडा गावातील ११ के व्ही लाईन ची देखभाल-दुरुस्ती , नवीन ए बी स्विच व बॉक्सची दुरुस्ती करण्यात आली तसेच रीडिंग न घेता येणारे ३२ मीटर बाहेर काढण्यात आले, खराब असलेले ३ मीटर तत्काळ बदलण्यात आले. कमी वीज वापर होत असलेल्या ४२ वीज जोडण्याची यावेळी तपासणी करण्यात आली. या प्रसंगी नवीन कृषी धोरणा अंतर्गत शेती पंपाच्या थकबाकीची दहा हजार रुपयाची रक्कम एकमुस्त भरणारे माजी सरपंच राम कृष्णाजी भड यांचा सत्कार महावितरण तर्फे नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण अमझरे, यांचे हस्ते करण्यात आला.सोबतच वीज ग्राहकाकडे असलेल्या थकबाकी वसुली मोहीम अंतर्गत एक लाख दहा हजार वसुली करण्यात आली. तसेच नवीन कृषी धोरण, सौर कृषी पंप धोरण, कृषी ग्राहकांच्या देयकाची दुरुस्ती यावर मार्गदर्शन केले. एक गाव एक दिवस या योजनेचे वैशिष्ट्य महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित वीज ग्राहकांना समजावून सांगितले. तसेच लोकप्रतिनिधींनी रोहित्र स्थानांतरित करण्याची केलेली मागणी लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सिल्लेवाडा गावात आयोजित महावितरणच्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे, पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी ,सरपंच प्रमिलाताई बागडे, उप सरपंच मधुकर दुगाने आदी मान्यवर उपस्थित होते. .कार्यक्रम करिता सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीपक भस्मे, खापरखेडा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश कहाले उपस्थित होते. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.