वऱ्हाड्यांवर नागपूर मनपाची कारवाई

Share This News

नागपूर : करोनासंदर्भात कडक दिशानिर्देश लागू करण्यात आल्यानंतरही क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाड्यांच्या गर्दीमुळे महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी शहरातील विविध मंगल कार्यालय, सभागृह येथे मोहिम राबवित विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई केली.
साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत करोनाचा सामूहिक प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने विवाह सोहळ्यांमध्ये ५० वऱ्हाड्यांची उपस्थित मर्यादीत केली आहे. १६ फेब्रुवारीला वसंत पंचमीचा दाट विवाह मुहूर्त असल्याने मंगल कार्यालयांमध्ये, सभागृहात गर्दी करू नये असे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानंतरही नियमांची पायमल्ली करणाऱ्या वऱ्हाड्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. सोमवारी सायंकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. सोमवारी तुकाराम सभागृहातील आयोजकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मंगळवारीही कारवाईचा वेग कायम होता. मंगळवारी जगनाडे चौकातील अनसूया मंगल कार्यालय, हसबागेतील जवाहर विद्यार्थी गृह, रेशीमबागेतील जैन कलार सभागृह, महात्मा फुले सभागृह, तुळशीबागेतील प्रतापसिंग भोसले सभागृह, भांडे प्लॉट चौकातील तुकडोजी सभागृहात मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई केली. महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथे तीनशेपेक्षा अधिक वऱ्हाडी आढळले. यातील ९० टक्के वऱ्हाडी मास्कशिवाय होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात आली.

अनसूया मंगल कार्यालय, जगनाडे चौक
जवाहर विद्यार्थी गृह, हसनबाग
जैन कलार सभागृह, रेशीमबाग
महात्मा फुले सभागृह, रेशीमबाग
प्रतापसिंग भोसले सभागृह, तुळशीबाग
तुकडोजी सभागृह, भांडे प्लॉट

या सर्व ठिकाणी 300 पेक्षा अधिक लोक असल्याचे आढळून आले आहे. मुख्य म्हणजे जवळपास सर्वांनीच मास्क लावलेले नव्हते. मास्क लावलेले दोन चार टक्के म्हणता येतील.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.