नागपूर : पुरोगामी चळवळीचा प्रेरणास्त्रोत हरपला – डॉ. नितीन राऊत
नागपूर, १५: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनाने देश पातळीवर पुरोगामी चळवळीमध्ये अग्रणी भूमिका निभावणारे व्यक्तीमत्व निखळले, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केली.
न्या. पी. बी सावंत यांनी न्यायदानाच्या क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय देऊन वेगळी प्रतिमा तयार केली. देशातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी ते एक आधारस्तंभ होते. त्यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडीयाचे अध्यक्ष म्हणून केलेले कार्य अतुलनीय असे आहे. महाराष्ट्राच्या शाहू-फुले-आंबेडकर आणि बहुजन विचारधारेच्या लोकांसाठी न्या. पी. बी. सावंत यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे राहिले आहे, असेही डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.