नागपूर : आझाद चौक ते भोला गणेश चौका पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद

Share This News

नागपूर : महापालिका क्षेत्रातील आझाद चौक, लकडी पूल व झेंडा चौक, भोला गणेश चौक ते सक्करदरा चौक जुनी शुक्रवारीपयर्ंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे प्रस्तावित केले आहे. वाहतुकीस होणार्‍या अडचणींमुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा -३ पॅकेज क्र १0 मधील रस्ता आझाद चौक, लकडी पूल व झेंडा चौक, भोला गणेश चौक ते सक्करदरा चौक जुनी शुक्रवारीपयर्ंतचा रस्त्या सिमेंट काँक्रीट करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याने आजाद चौक ते लाकडी पूल व झेंडा चौक ते भोला गणेश चौकपयर्ंतची रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे. सदर रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असून पर्याची मार्ग सुरू होतो त्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आले आहे. जनतेने वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.