नागपूर : सितारवादक उस्ताद नासिर खान यांचे कोरोनामुळे निधन Nagpur: Sitar player Ustad Nasir Khan dies due to corona

Share This News

नागपूर, 17 मार्च : नागपूर आकाशवाणीचे प्रसिद्ध सितारवादक उस्ताद नासिर खान यांचे आज, बुधवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. अतिशय मनमिळावू कलावंत म्हणून नासिर खान ओळखले जात. त्यांचे वडील उस्ताद हमीद खान हेही आकाशवाणीतच सारंगीवादक होते. त्यांच्या निधनामुळे कला जगतात शोककळा पसरली आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.