नागपूर : क्षेत्रस्तरावर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे : सभापती दिव्या धुरडे Nagpur: Skill development training program should be implemented at the field level: Speaker Divya Dhurde

Share This News

नागपूर , 17 मार्च

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती तर्फे क्षेत्र – झोनस्तरावर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे निर्देश महिला व बालकल्याण विशेष समितीच्या सभापती दिव्या धुरडे यांनी दिले.  मंगळवारी मनपा मुख्यालयातील  डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती  स्थायी समिती सभागृहात महिला व बालकल्याण विशेष समितीची सभा पार पडली. यावेळी  त्यांनी समिती अंतर्गत शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.

बैठकीत दहाही क्षेत्रात उपहारगृह सुरू करणे, सन २०१९-२० तसेच २०२०-२१ मध्ये समाजकल्याण विभागाद्वारे आणि महिल्या व बालकल्याण समिती अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा, प्रभागात महिलांकरिता प्रशिक्षण, एनयुएलएम अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती तसेच नवीन आशा स्वयंसेविकांची निवड करण्याबाबतची माहिती देणे इत्यादी विषय मांडण्यात आले.

यावेळी उपायुक्त राजेश भगत यांनी सांगितले की, समाजकल्याण विभागाद्वारे महिला समुपदेशन केंद्र, लाडली लक्ष्मी योजना, शिलाई मशिन वाटप तसेच महिला उद्याजिका मेळावा इत्यादी उपक्रम राबविले जात आहेत. याशिवाय दिव्‍यांगांसाठी ट्रायसिकल वाटप -आतापर्यंत ६६ दिव्‍यांगांना ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले आहे.  व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंत अनुदान दिले जाते. यात ९१ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. ३१ मार्चच्या आधी या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी महिती राजेश भगत यांनी यावेळी दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.