नागपूर : ओबीसी मार्चाचे कुलगुरूंना निवेदन

Share This News

नागपूर, 25 जानेवारी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांना ओबीसी महामोर्चातर्फे सोमवारी पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 20 टक्के प्रवेश कोटा वाढविण्याबाबत निवेदन देण्यात आले. 

निवेदनानुसार 2020 या संपूर्ण कालावधीत कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने विद्यार्थांच्या हितासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्वच विध्यापीठांनी इंटर्नल मार्क्स व ऑनलाइन परीक्षा नुसार विद्यार्थ्यांना गुण दिले त्यामुळे 95 ते 100 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले परंतु पुढील शिक्षणाकरिता अर्ज केला असता त्यापैकी 25 टक्के विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळू शकला नाही. विद्यार्थी रोज संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालय फिरतात परंतु सर्वच महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत असून पुढील आयुष्याची चिंता पडली आहे. तरी आज कुलगुरू सरांनसोबत राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ, युवा सेना व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांचा पदाधीकारांनी या विषयावर चर्चा केली व 20 टक्के जागा लवकरात लवकर वाढविण्यात यावे अशी मागणी केली जर मागणी पूर्ण झाली नाही तर विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. असा इशारा देण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष रवी पराते, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ अध्यक्ष निलेश कोढे, युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, ओबीसी विद्यार्थी महासंघ महासचिव रोशन कुंभलकर, नोविना भोयर, प्रणाली ढोबळे, युवा सेना समन्वयक निलेश तिघरे, सोनू गडेकर, शांतनु शेळके, पियुष कुहीकर, संजय डोकारमारे, सिध्दार्थ बागडे, रुपेश राऊत व आदी उपस्थित होते. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.