नागपूर : तेलंगणातील शिक्षकाला 91 किलो गांज्यासह अटक Nagpur: Telangana teacher arrested with 91 kg of cannabis

Share This News

नागपूर, 15 मार्च (हिं.स.) : तेलंगणातील एका शिक्षकाला नागपूर पोलिसांनी रविवारी 14 मार्च रोजी 91 किलो गांज्यासह अटक केलीय. शिवशंकर इसमपल्ली असे या आरोपीचे नाव असून तो तेलंगणातील हैदराबाद येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एकूण 18 लाख 84 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यासंदर्भात माहिती देताना बेलतरोडीचे पोलिस निरीक्षक विजय अकोत यांनी सांगितले की, हैदराबादहून काही आरोपी अंमलीपदार्थ घेऊन दिल्लीला जाणार असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक बेलतरोडी पोलिसांनी वर्धा मार्गावर सापळा रचला. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या कारची (वाहन क्र. डीएल 4सी एडी 3665) तपासणी केली असता वाहनात प्लास्टीकच्या पोत्यांमध्ये गांजा लपवून ठेवल्याचे आढळून आले. आरोपीकडून पोलिसांनी 13 लाख 73 हजार 340 रुपये किंमतीचा 91 किलोग्राम गांजा, एक मोबाईल फोन, 1200 रुपये रोख आणि चारचाकी वाहन असा एकूण 18 लाख 84 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिक्षक असून तस्करी याप्रकरणातील आरोपी शिवशंकर इसमपल्ली हा रामनगर, कुकटपल्ली (हैदराबाद) येथील रहिवासी असून तो पेशाने शिक्षक आहे. तो प्राथमिक शाळेत नोकरीला होता परंतु, लॉकडाऊनमुळे नोकरी गेली आणि पगार बंद झाला. त्यामुळे इसमपल्ली तस्करीच्या धंद्यात ओढला गेला. गांज्यासह शिक्षकाला अटक होण्याची गेल्या काही वर्षातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे यासंदर्भात आश्चर्य व्यक्त केले जातेय. दरम्यान सदर आरोपी खरोखर शिक्षक होता का आणि त्याने दिलेली माहितीमधील सत्यता पडताळून पाहण्याची गरज असल्याचे पोलिस निरीक्षक अकोत यांनी सांगितले


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.