नागपूर : शहरात ५00 पैकी ३२४ जणांचे लसीकरण, टक्केवारीत वाढ Nagpur: Vaccination of 324 out of 500 people in the city, increase in percentage
नागपूर
जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासूनच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील टक्केवारी खूप कमी दिसून येत आहे. परंतु आता हळूहळू या टक्केवारीतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी शहरात ५00 पैकी ३२४ जणांचे लसीकरण झाले. ज्यानुसार ६४.८ टक्के लसीकरण झाले होते. परंतु गुरुवारला ३३८ लोकांना लस टोचण्यात आली. म्हणजेच ६७.८ इतके लसीकरण झाले. बुधवारच्या तुलनेत गुरुवारला आरोग्य कर्मचार्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, गुरुवारला ग्रामीण भागामधील सातही केंद्रांवर लसीकरण झालेले नाही. १६ जानेवारी २0२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शहरातील पाच केंद्रांवर हे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय व पाचपावली प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा समावेश आहे. गुरुवारला या केंद्रावर ५00 पैकी ३३८ लोकांचे लसीकरण झाले. यात मेडिकलमध्ये २१, एम्समध्ये १00, मेयोत ७५, डागा ४0 तर पाचपावली केंद्रात १0२ लोकांचे लसीकरण झाले आहे. गुरुवारला ग्रामीणमधील सातही केंद्रांवर लसीकरण झालेले नसले तरी, शुक्रवार व शनिवारी येथे लसीकरण होणार आहे.