नागपुरी उन्हाळा

Share This News

रणरणत्या उन्हाळ्याचे दिवस म्हटले की शीतलतेची अनुभूती देणारे माठ, सुरया, उसाचा रसाचे स्मरण होतेच. पण, सध्या परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. दिवस लॉकडाऊनचे आहेत. रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत असला तरी हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांवर याही परिस्थितीत ग्राहक लाभण्याची प्रतीक्षा आहेच. करोना जसा कहर जाणवत आहे त्याच प्रमाणे नागपुरातील ऊन नागरिकांना जाणवत आहे. . उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटताना दिसते. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुरुवातीला होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे केले जातात, याच वेळी कलिंगड, फणस, इत्यादी फळे पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात आंबा पिकलेला दिसतो. याच काळात वळिवाचा वादळी पाऊस पडतो.उन्हाळ्याच्या दिवसांत निसर्गाचा उत्सव असतो. अनेक कवी पावसांवर कविता करुन त्याचे पावसाळ्याचे स्वागत करतात पण रंगपंचमी रंग उधळत उन्हाळ्याचे स्वागत करते. आमराई बहरुन येते, फळांचा राजा आंब्याचे आगमन होते, काजु दिमाखदारपणे मिरवत असतो. फणसाचा वास घुमू लागतो. कोकमाची झाड रसरशीत भरतात, राना वनात जांभळ, करवंद, आळू, रांजण, जाम, आवळे झाडांच्या फांदी फांदी वर डोलू लागतात.पण सध्याची परिस्थिति मात्र करोनाने वेढलेली आहे यातच हातावर आणून पानावर खाणाऱ्याची दशा मात्र त्यालाच माहीत असते, जस जसा उन्हाळा कडक तापू लागतो रस्त्यांवर वेळवेगळे व्यवसाय आपल्याला दिसतात यानुसार ऊसाचा तो रस आणि माठांचे मोकळे पण जानु लागले अर्धात हे सर्व दर्शनास येते . याच गोष्टीचे छायाचित्रण केले विशाल रायपुरे यांनी .


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.