काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पाटोले यांची नियुक्ती,सोबतीला असणार सहा कार्याध्यक्ष

Share This News

नाना पाटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांच्यासोबत राज्यात  सहा कार्यकारी अध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी या नव्या नियुक्त्यांचे पत्र जारी केले आहे. नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा राज्यातील नवा अध्यक्ष कोण असणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. गुरुवारी नाना पाटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पटोले यांच्याकडेच  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपवले जाणार हे निश्चित झाले होते. नवा प्रदेशाध्यक्ष नेमताना यावेळी मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सहा कार्यकारी अध्यक्षांची देखील नियुक्ती केली आहे. यात विदर्भातील यवतमाळचे काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांचा समावेश आहे. सोबतच बसवराज पाटील,मोहम्मद आरिफ नसीम खान, रोहिदास पाटील,चंद्रकांत हांडोरे व प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. यासह १० उपाध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिरीष चौधरी, रमेश बागवे,हुसेन दलवाई,मोहन जोशी,रणजित कांबळे,कैलाश गोरंट्याल,बी आय नगराळे,शरद आहेर,एम एम शेक व माणिक जगताप यांचा समावेश आहे . 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.