आमसभेत आभासी पध्दतीने नपचा 223 कोटींचा अर्थसंकल्प पारीत | NAPCA’s budget of Rs 223 crore was passed in a virtual manner at the general meeting

Share This News

गोंदिया-  स्थानिक नगर परिषदेचा सुधारित व अंदाजित अर्थसंकल्प 26 फेब्रुवारी रोजी नपच्या सभागृहात आभासी पध्दतीने घेण्यात आलेल्या आमसभेत पारीत करण्यात आला. यात शहरातील विविध विकास कामांविषयी चर्चा करून 223 कोटींचा रुपयाचा अंदाजित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून निधी अभावी शहरातील विविध विकास कामे खोळंबली आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून शहराच्या विकासासाठी कोणकोणत्या तरतुदी व निधी उपलब्धता होते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून होते.
यात प्रामुख्याने स्मशानघाटांकरिता 25 लाखाचा निधीचा सुरक्षित करण्यात आला असून जलसाठा व्यवस्थापनासाठी मोठे नाले बांधकामाकरिता 20 लाख, प्राथमिक व माध्यमिक शाळा इमारत बांधकााम व दुरुस्तीसाठी 30 लाख, नगरसेवक निधीकरिता 2 कोटी 30 लाख, तलाव व बोड्यांचे जलसंवर्धन, संकलनासाठी नगरोेत्थान अभियानातंर्गत 1 कोटी 25 लाख, नगर परिषद मालकीच्या जागांना सुरक्षाभिंतीसाठी 1 लाख 50 हजार, मुख्य चौकांचे सौंदर्यीकरण व विद्युतीकरणासाठी 8 लाख, रहदारीच्या ठिकाणी सुभलसुविधागृहांसाठी 10 लाख, नगर परिषद इमारतीत आवश्यक सुविधांसाठी 33 लाख, सुभाष बाग व निर्माणाधिन उद्यानाकरिता 60 लाख, प्रत्येक वॉर्डात व्यायामशाळेकरिता 1 कोटी, नगर परिषद जागेवर ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन केंद्राकरिता 12 लाख, नगर परिषद योजनांचा प्रचार करण्यासाठी 10 लाख, प्रवासी निवारा, पार्कींग व उद्यान निर्मितीकरिता 20 लाख, नवीन प्रशासकीय इमारत बांधकामसाठी 14 कोटी, नवीन दुकानगाळे बांधकामासाठी 50 कोटी, पोल शिफ्टिंग व नवीन विद्युुत पोल लावण्यासाठी 45 लाख रुपयांची अंदाजित अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.