कोरोनावर सर्वपक्षीय बैठक :व्हॅक्सीन कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर पहिलीच महत्वाची बैठक

Share This News

नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बैठक घेतील

सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 4 डिसेंबरला सकाळी 10.30 वाजता सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. सरकारची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसरी सर्वपक्षीय बैठक आहे. तसेच, मोदींच्या व्हॅक्सीन कंपन्यांच्या दौऱ्यानंतर पहिलीच महत्वाची बैठक आहे.

4 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत मोदींसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन संसदीय कार्य मंत्री प्रह्लाद जोशी आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवालदेखील सामील होऊ शकतात. ही बैठक अशावेळी बोलवण्यात आली आहे, जेव्हा दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनात मर्ज करण्याच्या चर्चा सुरू आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.