नाशिक जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २ हजार ७३० ने घट

Share This News

नाशिक, २ मे (हिं.स) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ८५ हजार ७२५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३८ हजार ०८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २ हजार ७३० ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण : नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ४४६, चांदवड १ हजार ५९, सिन्नर २ हजार ८१, दिंडोरी १ हजार ९३, निफाड २ हजार ४२१, देवळा १ हजार २३, नांदगांव ५०४, येवला ६९९, त्र्यंबकेश्वर ३७५, सुरगाणा ४७०, पेठ १३७, कळवण ६१६, बागलाण १ हजार ५०४, इगतपुरी ३४६, मालेगांव ग्रामीण ८३७ असे एकूण १५ हजार ६११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २० हजार ५५६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७१३ तर जिल्ह्याबाहेरील २०६ असे एकूण ३८ हजार ०८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख २७ हजार ३४६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८५.२४ टक्के, नाशिक शहरात ८८.६४ टक्के, मालेगाव मध्ये ८२.८७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.१७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.२९ इतके आहे. मृत्यु : नाशिक ग्रामीण १ हजार ६३२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ५५४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २५१ व जिल्हा बाहेरील ९८ अशा एकूण ३ हजार ५३५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय : ३ लाख २७ हजार ३४६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ८५ हजार ७२५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३८ हजार ०८६ पॉझिटिव्ह रुग्ण. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.२९ टक्के.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.