भारतात 24 तासात 45,903 नवे कोरोना रुग्ण , आकडा 85 लक्षाच्या पार
National corona count
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 45,903 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 490 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 48,405 नवे नागरिक बरे झाले आहेत. यासोबतच देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 85 लक्षाच्या पार गेला आहे. भारतात कोरोनाचे 85,53,657 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 5,09,673 झाली आहे . एकूण 79,17,373 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,26,611 वर पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.