कृषी कायद्याविरोधात मंत्री सुनील केदारांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन
केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आज शेतकऱ्यांनी देशभर चक्काजाम आंदोलन केलं. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात थंडीत कुडकुडत बसले आहे. मात्र केंद्र सरकारला जाग येत नाही. आता सरकारनं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं ऐकलं नाही तर या ते या केंद्र सरकारचा निर्णय घेईल, असं सुनील केदार यांनी यावेळी सांगितलं.