किंग्सवे हॉस्पिटलच्या प्रौढ लसीकरण क्लिनिकचा २६ जानेवारीला शुभारंभ

Share This News

नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथील किंग्सवे हॉस्पिटल मध्ये २६ जानेवारीपासून प्रौढ लसीकरण क्लिनिक सुरु होत आहे. या प्रौढ लसीकरण क्लिनिक अंतर्गत किशोर लसीकरण,गर्भवती स्त्रियांचे लसीकरण,आंतरराष्ट्रीय यात्रा लसीकरण,किडनी व यकृत प्रत्यारोपण लसीकरण याशिवाय विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे. किंग्सवे हॉस्पिटलच्या डॉ अश्विनी तायडे यांनी सांगितले कि एका छताखाली सर्व प्रकारांच्या प्रौढ लसीकरणाची मध्य भारतातील हि पहिलीच सुविधा किंग्सवे हॉस्पिटल ने उपलब्ध करून दिली आहे. इथे प्रौढ लसीकरणा विषयी जनजागृती देखील करण्यात येणार आहे. डॉ तायडे यांनी सांगितले कि ज्या लसी व्यक्ती बालपणी घेतात त्या सर्व लसींमुळे जीवनभर व्यक्तींचा बचाव होत नाही. कालांतराने काही लसींचा प्रभाव कमी होतो.तसेच व्यतीची रोग प्रतिकारक क्षमता कमी होत जाऊन विविध आजारांचे संक्रमण होण्याची भीती असते. मधुमेह,रक्तदाब या सारख्या आजारांमुळे किडनीचे आजार होण्याचा धोका असतो.अशात  निमोनियाच्या लसीकरणाची गरज असते. जनगृतीचा अभाव असल्याने लसीकरण करण्यास प्रौढ व्यक्ती येत नाही सोबतच लसीकरणामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची भीतीही लोकांमध्ये असते. हि भीती समाप्त करण्यासाठी प्रौढांनी देखील लसीकरण करायला पाहिजे व खासकरून मधुमेह व रक्तदाब असलेल्या रुगणांनी लसीकरण करणे आवश्यक असल्याचं डॉ तायडे यांनी सांगितले. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.