राष्ट्रीय मतदार दिन: ६७ वर्षांमध्ये मतदारांची संख्या अठरा लाखांहून अधिक

Share This News

१९५२ साली झालेल्या पहिली सार्वत्रिक निवडणूक विदर्भ प्रदेश, मध्य प्रांत आणि बेरार प्रांत असताना झाल्या. त्यावेळी विदर्भात लोकसभेचे आठ मतदारसंघ होते. यातील नागपूर हा मोठ्या मतदारसंघांपैकी होता. यात नागपूरसह उमरेड व कामठी यांचादेखील समावेश होता. नागपूर लोकसभा क्षेत्राची एकूण मतदारसंख्या ही ३ लाख ५२ हजार ८७० इतकी होती. १९५७ साली मतदारसंख्येत केवळ २१ हजारांनी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची मोहीम व्यापक करण्यास सुरुवात केली. १९८४ मध्ये मतदारसंख्या ८ लाख ४५ हजार ८०५ इतकी होती. त्यानंतरच्या पाच वर्षांतच १९८९ मध्ये यात ३ लाख ३७ हजार ८६७ इतकी वाढ झाली व मतदारांची संख्या ११ लाख ८३ हजार ६७२ वर पोहोचली. मतदारसंघ रचनेच्या ३७ वर्षांनी मतदारसंख्या प्रथमच १० लाखांच्या पार गेली होती.नागपूर लोकसभा मतदारसंघाची रचना १९५२ साली झाली. त्यानंतर लोकसंख्या व पर्यायाने मतदारांची संख्या सातत्याने वाढतच गेल्याचे दिसून आले. ६७ वर्षांमध्ये मतदारांची संख्या ही अठरा लाखांहून अधिक संख्येने वाढली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा या मतदारसंघाची मतदार संख्या २० लाखांच्या पार गेली, हे विशेष.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.