अरुण गवळी नंतर नागपूर कारागृहात नक्षल समर्थक जी एन साईबाबाला कोरोनाचा संसर्ग

Share This News

साईबाबा सह 4 कैदी देखील करोना पॉजिटीव्ह

एक्सरे व इतर वैद्यकीय चाचण्या करिता साईबाबा ला मेडिकल मध्ये नेण्यात आले आहे.


नक्षल समर्थक जी एन साईबाबा मे २०१४ पासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात तुरूंगात आहेत . नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.एन. साईबाबाला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे . महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने साईबाबा आणि जेएनयू विद्यार्थ्यासह चौघांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याबद्दल आणि देशाविरूद्ध कार्यात गुंतल्याबद्दल दोषी ठरवले आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या साईबाबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापूर्वी नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जी एन साईबाबाचा कोरोना अहवाल पॉसिटीव आल्यावर वैद्यकीय चाचण्यासाठी त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यापूर्वी नागपूर कारागृहात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला होता त्यानंतर तुरुंगात कोरोना ने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने तुरुंग प्रशासनाचा तान वाढला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.