पेंटीपाका येथे नक्षली बँनर ; बोगस काम बंद करण्याचा इशारा Naxalite banner at Pentipaka; A warning to stop bogus work

Share This News

गडचिरोली दि. 19 – नक्षल्यांनी सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटीपाकचेक गावानजीक रस्त्याच्या बांधकामा संदर्भात बॅनर बांधले असुन त्यावर बोगस काम बंद करा अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल अशा इशारा दिला आहे त्यामुळे परीसरात दहशत निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर सिरोंचा पासुन 13 किलोमीटर अंतरावर पेंटिपाका चेक गावापासुन 800 मीटर दुर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम प्रशांत कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून सिरोंचा येथील पेटी कॅन्ट्रॅक्टर करीत आहे. मात्र कामाचा दर्जा चांगला नसल्याचा आक्षेप बॅनरमधुन घेण्यात आला आहे. बोगस काम बंद करावे अन्यथा होणाऱ्या परीणामास तयार रहा अशा आशयाचा मजकुर हिंदी भाषेत लिहीला आहे. त्याखाली भाकपा माओवादी असा उल्लेख करण्यात आला आहे. नक्षल्यांनी बांधलेल्या या बॅनरमुळे नागरीक तसेच कंत्राटदारामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.