नक्षल्यांची २0 किलो स्फोटके, २७ डिटोनेटर जप्त
गोंदिया |
घातपात घडविण्यासोबतच पोलिसांना ठार करण्याच्या उद्देशाने सालेकसा तालुक्यातील गेंडूरझरिया डोंगर परिसरात पेरून ठेवलेले २0 किलो स्फोटके व २७ डिटोनेटर पोलिस दलाच्या विविध विभागांनी संयुक्तरित्या कारवाई करीत जप्त केले. ही कारवाई शनिवार, २६ डिसेंबर रोजी करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे उपस्थित होते. सालेकसा तालुक्यातील र्देकसा जवळील गेंडूरझरिया डोंगर परिसरात नक्षल्यांची स्फोटके पेरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस विभागाचे सी-६0 चे कमांडो पथक, बीडीडीएस पथक व सालेकसा पोलिसांनी संयुक्तरित्या राबविलेल्या शोधमोहिमेत र्देकसा जवळील गेंडूरझरिया डोंगर परिसरात नक्षल्यांनी घातपात व पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने पेरून ठेवलेले २0२0 किलो वजनाचे १५0 स्फोटके व २७ इलेक्ट्रिक डेटोनेटर आढळून आले. या पथकाने स्फोटके जप्त केली असून नक्षलवाद्यांवर भादंवि अन्वये गुन्हा दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. |