घोड्यावर स्वार राष्ट्रवादीने धुडकावली मुख्यमंत्र्यांची विनंती
नागपूर : ‘राजकीय पक्षांनी आंदोलने टाळावी’ मुख्यमंत्र्यांनी असे आवाहन करुन अवघे चोवीस तासही उलटायचे असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरातील संविधान चौकात घोड्यावर स्वार होऊन महागाईच्या विरोधात आंदोलन केले.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘ मी जबाबदार’ उपक्रमाची घोषणा केली होती. राजकीय कार्यकर्त्यांनी सजग असावे, आंदोलने करु नयेत, मोर्चे काढू नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. नागपुरात राष्ट्रवादीच्या वाहतूक सेलने मात्र मुख्यमंत्र्यांची विनंती धुडकावत पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या विरोधात आंदोलन केले. अनोखे आंदोलन करुन लक्ष वेधून घेण्यासाठी काही जणांनी घोड्यावर स्वार होऊन आंदोलनात सहभाग घेतला.
घोड्यावर स्वार राष्ट्रवादीने धुडकावली मुख्यमंत्र्यांची विनंती