‘नीट’चा ‘बोगस’ पेपर सोशल मीडियावर व्हायरल; विद्यार्थी,पालक संभ्रमात

Share This News

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट) पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 50 पैकी 45 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील असे या पेपरमध्ये म्हटले गेले आहे. या व्हायरल पोस्टने विद्यार्थी आणि पालकवर्ग संभ्रमात पडला आहे. मात्र हा पेपर बोगस असल्याचे राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) स्पष्ट केले आहे.

‘नीट’ परीक्षेच्या एका पेपरचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पेपर एनटीएने जारी केल्याचा दावा त्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. जेईई आणि नीट परीक्षेच्या पेपरमध्ये यंदाच्या वर्षी पर्यायी प्रश्न असतील असे अलीकडेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्यामुळे नव्या पॅटर्ननुसार हा पेपर एनटीएने काढला असावा असा विद्यार्थ्यांचा समज झाला आहे. मात्र ही पोस्ट बोगस असल्याचे एनटीएने म्हटले आहे.

एनटीएने आतापर्यंत नवा पेपर पॅटर्न जाहीर केलेला नाही असे ट्विटरवर स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी एनटीएच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात येणार नाही असेही एनटीएने अलीकडेच जाहीर केले होते. ‘नीट’ परीक्षा येत्या 1 ऑगस्ट रोजी होणार आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.