अमिताभ बच्चन यांच्यामुळे नेटिझन्स गोंधळात

Share This News

मुंबई : मागच्या काही दिवसांमधील अमिताभ बच्चन यांच्या ट्वीट्सनी युझर्सना गोंधळात टाकलं आहे.
बिग बी अलीकडच्या काळातील आपल्या सर्व पोस्टमध्ये WHTCTW असा उल्लेख करीत आहेत. अमिताभ मागच्या बऱ्याच काळापासून त्यांच्या ट्वीटमध्ये उल्लेख करत असलेल्या WHTCTW चा अर्थ नक्की काय आहे हे कोणालाच समजत नाही आहे आणि त्यामुळे चाहते गोंधळले आहेत. त्यामुळे अनेक युझर्सनी आता अमिताभ बच्चन यांनाच हे WHTCTW नक्की काय आहे ते सांगण्याची विनंती केली आहे. मात्र अनेकांनी वारंवार विनंती करूनही अद्याप अमिताभ बच्चन यांनी WHTCTW या कोडवर्डचा उलगडा केलेला नाही. अनेकांच्या मते हा कोडवर्ड कोरोनाशी संबंधित काही संदेश असू शकतो असे बिग बी यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.