नागपूरकर गोवारदिपे बार कौन्सिलचे नवे अध्यक्ष |New President of Nagpurkar Govardipe Bar Council

Share This News

नागपूर :
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाच्या अध्यक्षपदी नागपूरचे अॅड. अनिल गोवारदिपे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत गोवारदिपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तीन दशकांचा वकिलीचा अनुभव असलेले गोवारदिपे १९८८पासून विधी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी १९९९ ते २००४ या काळात विशेष सरकारी (मोक्का) म्हणूनही काम पाहिले आहे. २००२ ते २००४ या काळात ते जिल्हा बार असोसिएशनचे सचिव होते. २०१०मध्ये ते पहिल्यांदा बार कौन्सिलचे सदस्य म्हणून निवडून आलेत. त्यांनी दोन वेळा बार कौन्सिलचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. २०१९मध्ये सलग दुसऱ्यांना ते कौन्सिलचे सदस्य म्हणून निवडून आले होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.