कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा इंग्लंडमध्ये कहर New strain of corona virus wreaks havoc in England

Share This News

लंडन
इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला असून गेल्या २४ तासांत ५५ हजारांहून अधिक बाधित आढळून आले आहेत. तर ९६४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. येथे महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढय़ा मोठा प्रमाणात बाधित समोर आले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया आणि कोलोराडोनंतर आता फ्लोरिडा प्रांतातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित रुग्ण समोर आले आहे. याचबरोबर रशियातही बाधितांची संख्या वाढली आहे.
इंग्लंडमध्ये गेल्या २४ तासांत ५५ हजार ८९२ नवे संक्रमित आढळून आले असून येथे सलग तिसर्‍या दिवशी ५0 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आहे. यामुळे इंग्लंनमधील कोरोनाबाधितांची संख्या २४ लाख ८८ हजारांहून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत ७३ हजार ५१२ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अडकलेल्या इंग्लंडमध्ये गेल्या महिन्यात कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आला होता. यानंतरच येथे नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढायला सुरुवात झाली. हा स्ट्रेन इंग्लंडमधून जगभरातील अनेक देशांत पोहोचला आहे. कोरोनाचे हे रुप ७0 टक्के अधिक संक्रमित असल्याचे बोलले जात आहे. रशियातही २७ हजार नवे रुग्ण आढळून आल्याने येथील एकूण रुग्णांचा आकडा आता ३१ लाख ८६ हजारवर पोहोचला आहे. तर येथे आतापयर्ंत एकूण ५७ हजार ५५५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
थायलंडमध्ये बँकॉक येथे कोरोनाचे २७९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शाळा आणि मनोरंजन पार्क बंद करण्यात आली आहेत. अमेरिका आणि फ्रान्समध्ये आढळले नव्या स्ट्रेनचे रुग्ण – अमेरिकेत कॅलिफोर्निया आणि कोलोराडोनंतर आता फ्लोरिडा प्रांतातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या प्रांतातील मार्टिन काउंटीमध्ये २0वर्षांच्या नव्या रुग्णाला या स्ट्रेनच्या कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेलाच कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे आतापयर्ंत जवळपास दोन कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन लाख ४२हजारहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.