न्यूझीलंडचा मोठा निर्णय; भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर देशात प्रवेश बंदी

Share This News

गेल्या काही दिवासांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडनं मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडनंभारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ११ एप्रिलपासून हा नियम लागू होईल.  न्यूझीलंडनं घातलेली ही बंदी तात्पुरत्या कालावधीसाठी असेल. भारतातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांवर ११ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत बंदी असेल. न्यूझीलंडमध्ये ११ एप्रिल संध्याकाली ४ वाजल्यापासून हा नियम लागू होईल अशी घोषणा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी केली. हा नियम भारतातून न्यूझीलंडमध्ये परतणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू असेल.गेल्या काही दिवासांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडनं मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडनंभारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ११ एप्रिलपासून हा नियम लागू होईल.  न्यूझीलंडनं घातलेली ही बंदी तात्पुरत्या कालावधीसाठी असेल. भारतातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांवर ११ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत बंदी असेल. न्यूझीलंडमध्ये ११ एप्रिल संध्याकाली ४ वाजल्यापासून हा नियम लागू होईल अशी घोषणा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी केली. हा नियम भारतातून न्यूझीलंडमध्ये परतणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू असेल.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.