भंडाऱ्यात नवजात शिशु केयर युनिटला आग,10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारच्या मध्यरात्री सुमारे दोन वाजता ही आग लागली.त्यावेळी युनिटमधील सतरा बालकांपैकी 7 बाळांना वाचविण्यात यश आलेला आहे.

शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबोर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निषमन दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNCU मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत यापैकी मॉनिटर मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.