खासदार पटेलांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार | Newly elected Gram Panchayat members felicitated by MP Patel

Share This News

भंडारा,दि.27 –  येथील शासकिय विश्रामगृहामध्ये खा.प्रफुल पटेल यांनी पक्ष पदाधिकारीं व कार्यकर्तांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केली.पदाधिकार्यांकडून समस्या जाणून घेत कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची काटेकोर पालन करावे अशी सुचना केली. यावेळी सर्वश्री विलासराव शृगारपवार, नाना पंचबुद्धे, राजेंद्र जैन, राजुभाऊ कारेमोरे, मधुकर कुकडे, धनंजय दलाल, नरेंद्र झंझाड, यशवंत सोनकुसरे, हेमंत महाकाडकर, आरजु मेश्रााम, ईश्वर कळंबे, सरिता मदनकर, ज्योती खवास, ज्याती टेंभुर्णे, मनोरथा जांभुळे, ऍड नेहा शेंडे, रामरतन वैरागडे, दयानंद नखाते, महादेव पंचघरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
ग्राम सर्पेवाडा – सरपंच किशोर मसराम, उपसरपंच नागेश्वर कळपाते, गराडा – सरपंच सौ. वंदना चौहान, उपसरपंच सौ. निलीमा गाढवे, सदस्य सौ. साधना गोंडांणे, सुद्वोधन गोंडाणे, विक्की मेश्रााम, सौ. गायत्री भोयर, महादेव हलमारे, पचखेडी – सरपंच लोकेश थोटे, उपसरपंच सौ. यमुना केवट, सदस्य संजय धारगांवे, राजेगांव – सरपंच प्रदिप वासनिक, उपसरपंच रविंद्र थोटे, सदस्य सौ. मनिशा थोटे, संजीव शेंडे , कोका – सरपंच सौ. सरिता कोळवते, उपसरपंच सौ. वर्षा सहारे, सदस्य रविंद्र तिडके, सौ. शुभांगी भांडारकर, दाभा – सरपंच सौ. अस्मिता सहारे, उपसरपंच दिपक खांदाडे, गोरेवाडी – सरपंच सौ. सुनंदा मडावी, उपसरपंच हर्शदिप ठवकर, सदस्य सौ. सीता दहिवले, सौ. पदमा ठाकरे, मानेगांव (बाजार) – सरपंच सौ. कविता डोरले, उपसरपंच अतुल कानतोडे , सौ. मनीषा बोदेले, दिलीप गभने, कैलास बावनकुडे, बोरगांव – संजय कटकवार, रावनवाडी – नितेश मस्के, टवेपार – सरपंच सौ. रिना गजभिये, सदस्य सागर कोसरे, गणेश तिजारे, चांदोरी – उपसरपंच छत्रपती कागदे, माटोरा – रवीकेश मेश्राम, माधव रेहपाडे, हेमंत सेलोकर व इतर सदस्यांना शुभेच्छा दिल्या. पक्ष आपल्या पाठीशी असुन गावाचा विकास करण्यात सर्वांचे योगदान राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.