खा.पटेलांच्या हस्ते तुमसर / मोहाडी तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार

Share This News

तुमसर,– तुमसर व मोहाडी तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने आज राजाराम लाँन येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष पदाधिकारी बैठक पार पडली.यावेळी पटेलांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच मोहाडी व तुमसर तालुक्यातील नवनिर्चावीच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला.  खा. पटेल यांनी बोलतांना सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आले पाहिजे याकरिता नियोजन करुन काम करावे.आम्ही शेतकरी बांधव व सामान्य माणसाच्या हितासाठी नेहमीच कामे केली आहे. जनतेपर्यंत आपण केलेल्या कामांची माहिती द्या.तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन नागरिकांनी स्वतः सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी अशी सुचना केली.        तुमसर येथील कार्यक्रमात खा. पटेल यांच्या सोबत सर्वश्री जिलाध्यक्ष नानाभाऊ पंचबुध्दे, आमदार राजुभाऊ कोरेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे,भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल, देवचंद ठाकरे, विजय डेकाटे, धनेंद्र तुरकर, ठाकचंद मुंगूसमारे, राजु माटे, अभिषेक कारेमोरे, वासुदेव बांते,योगेश सिंघंनजुडे, सदाशिव ढेंगे ,महादेव पंचघरे, विजय पारधी, किरण अतकरी, सौ. पमा ठाकुर, सौ.सरोजताई भुरे, सौ जयश्रीताई गभने, सौ. शुभांगी रहांगडाले, सौ. गिताताई माटे, सौ. रिताताई हलमारे, सौ. रंजिताताई कारेमोरे, सौ मीनाताई गाढवे, सौ. प्रेरणाताई तुरकर, सौ.प्रतीक्षाताई कटरे, कु.स्वेताताई काहालकर, राजेश देशमुख, रविकांत बोपचे, सुनील थोटे, निषीकांत पेठे नरेश ईश्वरकर,अनिल काळे, उमेश तुरकर, अरविंद येळणे, एकनाथ फेंडर, संजय मिराशे, चंदू सेलोकर, भुपेंद्र पवनकर, महादेव बुरडे, खुशाल कोसरे, उमेश कटरे, सुरेश रांगडाले, हेमंत शहारे,आनंद मलेवार, संजय चोपकर, शिशुपाल गौपाले, नानू परमार, याशींन ठवारे, बाबा समरीत, झगडू बुधे आदी उपस्थित होते.

या वेळी खा. प्रफुल पटेल यांच्या कडून तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.पक्ष आपल्या पाठीशी असुन गावाचा विकास करण्यात सर्वांचे योगदान राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. मोहाडी तालुक्यातील ग्राम पाचगाव – सरपंच संतुलाल गजभिये, माडेसर – सरपंच  गुलाब सवालाखे, उपसरपंच  रोशन लिल्हारे, पंजाराबोडी – सरपंच  किरण शहारे, उपसरपंच  गौरीशंकर राऊत, पिंपडगाव (का) – सरपंच सौ. रेखा गभणे, उपसरपंच उमेश उपरकर, कान्हळगाव (सि) – सरपंच  जागेश्वर मेश्राम, उपसरपंच सौ. कांचन निंबार्ते, पिंपडगाव (झ) – सरपंच सौ. सविता झंझाडे, उपसरपंच  सुशांत लिल्हारे, खडकी – सरपंच  अश्विन बागडे, जांबोरा – सरपंच सौ. वनिता राऊत, ताडगाव – सरपंच  कांचन हारगुडे, तुमसर तालुक्यातील ग्राम येदरबुची – सरपंच  घनश्याम नोणारे, उपसरपंच महेशकुमार नंदेश्वर, आंबागड – सरपंच  गोपीचंद बावनकर, पिपरीचुन्नी – सरपंच  विजय कुमार पटले, उपसरपंच श्रीविनोद ठाकरे, स्टेशनटोली – सरपंच सौ. सुनीता बघेल, उपसरपंच  श्यामराव नागपुरे व इतर ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमात तुमसर येथील अन्य पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी खा.  प्रफुल पटेल यांच्या निष्ठेवर विश्वास ठेवीत राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.