एनआयए, एटीएसचा तपास नि:पक्ष होणार : देशमुख NIA, ATS probe to be impartial: Deshmukh

Share This News

मुंबई : अंबानी यांच्या घराबाहेर सापडेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा व सचिन वाझे यांच्या संदर्भातील चौकशी नि:पक्षपणे व्हावी यासाठी राज्यातील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवार, १८ मार्चला स्पष्ट केले.
मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे एनआयए व एटीएसच्या तपासात विघ्न येऊ नये यासाठी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागल्या. तपास नि:पक्षपणेच होणार असल्याचे ते म्हणाले. वाझे यांच्या सदंर्भात ज्या कुणाची नावे पुढे येतील त्यापैकी कोणालाही सोडण्यात येणार नाही, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. बदल्यांमुळे अधिकारी नाराज होतात. मात्र येथे प्रश्न सरकारी यंत्रणा चांगल्या पद्धतीने चालविण्याचा आहे. सरकार आणि तपास यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यामुळे इतरांनीही तपास यंत्रणेला सहकार्य करावे, असे देशमुख म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.