दिल्ली स्फोटाचा तपास एनआयएकडे NIA probe into Delhi blasts

Share This News

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात दिल्लीतील इस्राईलच्या दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीकडे (एनआयए) देण्यात आला आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयाने निर्देश दिले आहेत. गेल्या २९ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीच्या विजय चौकामध्ये बीटिंग दि रिट्रीट सोहळा सुरू असतानाच, तेथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट झाला होता. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नव्हती, मात्र चार-पाच वाहनांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी आता गृहमंत्रालयाकडून आदेश मिळाल्यानंतर आता एनआयए संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून याचा तपास सुरू करेल. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आता याबाबतची सर्व माहिती एनआयएकडे सुपूर्द करेल. एनआयए अधिकार्‍यांनी यापूर्वीच घटनास्थळाला भेट दिली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.