कोरोनाचा प्रसार रोखण्यात रात्रीची संचारबंदी उपयुक्त नाही

Share This News

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा दावा, लसीकरणावर भर देण्याची गरज

मुंबई ः कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची उपाययोजना अंमलात येणार असताना हा उपाय पुरेसा नाही, असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात रविवारी रात्रीपासून रात्रीच्या जमावबंदीची उपाययोजना लागू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हे मत व्यक्त केले आहे. राज्यात अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागलेले आहे. आता रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. मात्र, लसीकरणामुळेच कोरोनाची दुसरी लाट थोपविली जाऊ शकते, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. लसीकरणानंतरही सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. भारतातील कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी अतिशय सुरक्षित असून भारतात लसीकरणानंतर दिसून येणाऱ्या परिणामांची पाहणी अतिशय प्रभावी यंत्रणांच्या माध्यमातून सुरु आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शुक्रवारी रात्रात सुमारे ३७ हजाराच्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. उपराजधानी नागपुरात गंभीर परिस्थिती असून रुग्णांसाठी आता रुग्णालयेच उपलब्ध नसण्याची परिस्थिती निर्माण होत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.