महाराष्ट्र : नक्षलवादी हल्ल्यात नाशिकच्या जवानाला वीरमरण, नऊ जखमी

Share This News

छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकार्‍यासह ९ जवान जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. नितीन भालेराव हे नाशिकचे असून सहाय्यक कमांडर म्हणून कार्यरत होते.
ताडमेटला परिसरात शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटात कोबरा २0६ बटालियनचे १0 जखमी झाले. त्यात नितीन भालेराव यांचा समावेश होता. जखमी जवानांना उपचारासाठी तात्काळ रायपूर येथे विमानाने हलविण्यात आले. मात्र, भालेराव यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तर, अन्य सात जवानांवर उपचार सुरू आहेत. दोघांवर चिंतलनार येथील सीआरपीएफच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
नितीन भालेराव यांचे कुटुंब नाशिकच्या राजीव नगर भागात वास्तव्यास आहे. नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव हे छत्तीसगढ मध्ये शहीद झालेले आहेत. सध्या त्यांचे पोस्टमार्टम सुरू आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव रायपूरहून विमानाने मुंबईत आणले जाईल व तेथून ते नाशिकला आणले जाईल. त्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करून त्यानुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.