पाचगावच्या हॅन्डलूम क्लस्टर ला गडकरींची भेट

Share This News

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या ‘समर्थ’ योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे सुरू झालेल्या हॅंडलूम क्लस्टरला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी भेट दिली. या क्लस्टरमधून १६८ महिलांना रोजगार मिळणार आहे. कापड्याच्या चिंध्यांपासून सुंदर चटई, चादरी इत्यादी हॅंडलूम उत्पादने तयार होत आहेत. ‘सांसद आदर्श गाव  योजने’अंतर्गत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पाचगाव दत्तक घेतले आहे. ज्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून आत्तापर्यंत ७३ कामांसाठी १९.३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गडकरी यांनी या कामाचे निरिक्षण केले. या वेळी गावकऱ्यांनी नितीन गडकरी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.