नितीन राऊत यांच ऊर्जामंत्रीपद जाणार,विधानसभा अध्यक्षपदाची लागणार लॉटरी

Share This News

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी लागल्यावर विधानसभा अध्यक्षपद ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचेकडे जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक फेरबदल  करण्यात येत आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाल्यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पाटोले यांची नियुक्ती करण्यात  आली. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यावर विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे नाना पटोले व नितीन राऊत या दोन्ही नेत्यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यामुळे नाना पटोले आणि राऊत यांच्या खांदेपालट होणार असल्याची ‘शंखनाद’ला सूत्रांनी माहिती दिलीय. पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदासोबतच ऊर्जा खाते देऊन विधानसभा अध्यक्षपदी नितीन राऊत यांची निवड करण्यात येणार आहे. नितीन राऊत यांच्या रूपात विधानसभा अध्यक्षपद दलित नेत्याकडे जाण्यावर महाविकास आघाडीतील सेना-राष्ट्रवादी पक्षांचाही विरोध नसेल सोबतच राज्यातील दलित मतदारांना खुश करण्याची काँग्रेसची ही राजकीय खेळी असल्याचेही सांगण्यात येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.