मंगळ नसल्याने घटस्फोट नाही : हायकोर्ट No divorce due to lack of Mars: High Court

Share This News

नागपूर : जन्म कुंडलीनुसार मांगलिक असल्याचे खोटे सांगत लग्न करून फसवणूक केल्याचा आरोप करीत घटस्फोट मागणाऱ्या पतीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला आहे. न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.


एका ३७ वर्षीय व्यक्तीने पत्नीपासून घटस्फोट मिळावा म्हणून न्यायालयात दाद मागितली होती. त्याच्या पत्नी आणि सासरच्या मंडळीने खोटी माहिती देऊन फसविल्याचा आरोप त्याने केला होता. मुलसला मंगळ असल्याने त्याला मांगलिक मुलीशीच लग्न करायचे होते. त्याद्वारे भविष्यातील अशुभ घटना टाळता येतात असा त्याचा विश्वास होता. लग्नापूर्वी सासरच्या मंडळीने त्याला मुलीची खोटी जन्मतिथी सांगितली. त्यानुसार ती मांगलिक होती. मात्र, वास्तविक पाहता ही मांगलिक नव्हती. पुढे ही बाब त्याला कळली. फसवणूक केल्याचा आरोप करीत त्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळला. या आदेशाला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, पत्नी व तिच्या पालकांनी खोटी माहिती दिली हे जरी खरे असले तरी मांगलिक नसणे ही क्रुरता नाही. पत्नीने त्रास दिला किंवा ती त्याच्यासोबत क्रुरतापूर्वक वागली हे देखील पतीला सिद्ध करता आले नाही. त्यामुळे ती केवळ मांगलिक नसल्याने आपले नुकसान होईल हा केवळ त्याचा भ्रम आहे. कौटुंबिक न्यायालयाचा घटस्फोटाला परवानगी न देण्याचा निर्णय योग्य आहे, असे मत नोंदवित न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.